कोरोना आणि होम आयसोलेशन उपचार

 कोरोना चा अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर घाबरून न जाता  डाॅक्टरांकडून आपल्याला झालेल्या कोरोनाची स्थिती व्यवस्थित  समजावून घ्या. सुरूवातीच्या अवस्थेत आपण लवकर उपचार सुरू केले तर सर्वच्या सर्व रुग्ण घरी राहून यातून बरे होऊ शकतात. सर्व काळजी घेतली व वेळीच निदान करून आयसोलेट  होउन डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतल्यास आपण या आजारातून घरच्या घरी  पूर्णपणे मुक्त होऊ शकतो.सकारात्मक विचार रुग्णाला लवकर  बरं होण्यासाठी मदत करतो.

आयसोलेशनसाठीचे नियम :

 • लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना, कोणतीही सहव्याधी नसणाऱ्या पण कोरोनाची सौम्य लक्षणं असणाऱ्यांनाही घरीच आयसोलेट होता येईल.
 • वयाने ज्येष्ठ असणाऱ्या, सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणं दिसत नसली, तरी त्या व्यक्तीच्या फॅमिली डॉक्टरसोबत चर्चा केल्यानंतर होम आयसोलेशनबद्दल निर्णय घेण्यात येईल.
 • या रुग्णाची घरी रात्रं-दिवस काळजी घेणारी व्यक्ती असणं आवश्यक आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि उपचार करणारे डाॅक्टर यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी, मोबाईल) असावी.
 • आयसोलेट होणाऱ्या व्यक्तीकडे पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर, फेस मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर या गोष्टी असाव्या.

होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या व्यक्तीने काय करायचं?

 • पूर्णवेळ खोलीत एकटं राहणं शक्य नसेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या ज्येष्ठ नागरिकांपासून, गर्भवती महिलांपासून, लहान मुलं आणि इतर व्याधी – comorbidities असणाऱ्या व्यक्तींपासून दूर रहा.
 • वैयक्तिक हायजीन – स्वच्छता पाळा.आणि औषधं वेळेवर घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका.
 • हात न धुता तोंड, नाक, डोळे, कान यांना स्पर्श करू नका. 
 • साबणाने नियमितपणे हात धुवा.
 • तुमच्यासाठी निश्चीत केलेले स्वच्छतागृह वापरा,आणि त्याला झाकण असेल तर फ्लश करण्यापूर्वी ते झाकण बंद करा. 
 • भरपूर विश्रांती घ्या आणि शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी पाणी, फळांचा रस,गुळाचा चहा, सूप, शहाळ(नारळ पाणी),सरबत ( कोकम,पुदीना ) अशा द्रव पदार्थांचे सेवन करा. 
 • रोज तीन वेळा जेवा.जेवणात पिष्टमय पदार्थ कमी आणि प्रथिनांच्या जास्त असू द्या. 
 • नेहमी शिंकताना किंवा खोकतांना थेट तुमच्या मास्कमध्ये,रुमालात किंवा कोपराने झाकून ही क्रिया करा. 
 • तुमची भांडी, टाॅवेल अशा वैयक्तिक वापराच्या वस्तू अन्य कुटुंबीयांना वापरायला देवू नका.
 • रुग्णाचे कपडे, ताटं-पेले-कप, बेडशीट्स, टॉवेल वेगळे धुवा.
 • डाॅक्टरांनी दिलेली  औषधे अत्यंत नियमितपणे घ्या. अन्य कुठले औषध नियमित घेत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
 • आयसोलेशनच्या दरम्यान अल्कोहोलचे सेवन आणि धुम्रपान टाळा.
 • दररोज 2 वेळा गरम पाण्याची वाफ घ्या. 
 • घरातला तुमचा वावर मर्यादित ठेवा. घरात वावरताना मास्क वापरा.
 • चुकूनही लोकांमध्ये मिसळू नका, घराबाहेर पडू नका.
 • रुग्णाच्या वापराच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असाव्यात. अगदी त्यांचं जेवणाचं ताट – पेलाही वेगळा ठेवा.
 • रुग्णाला जेवण देताना, खोली स्वच्छ करताना मास्क आणि ग्लोव्हज वापरा. एका वापरानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावा.
 • कुटुंबातील एकाच व्यक्तीने या रुग्णाची काळजी घ्यावी.
 • रुग्णाला सौम्य लक्षणं आढळत असतील, तर लक्षणं वाढतायत का, यावर लक्ष असू द्या.
 • आराम करतांना जास्तीत जास्त वेळ पोटावर झोपा.पाठीवर झोपू नका. असे झोपल्याने श्वास फुफ्फुसांच्या सर्व भागात पोहोचतो व ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास  मदत होते.

होम आयसोलेशनमध्ये नेमकं किती दिवस राहायचं?

लक्षणं दिसणं सुरू झाल्यापासून 17 दिवस आपण होम क्वारंटाईन पाळणं गरजेचं आहे. चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला गेला, तिथून 17 दिवस मोजावेत आणि मग सलग 10 दिवस जर ताप नसेल तर त्या व्यक्तीला होम आयसोलेमुक्त करण्यात येतं.

हॉस्पिटलमध्ये कधी जायचं?

घरामध्ये आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीच्या तब्येतीवर लक्ष ठेवावं. या व्यक्तीला खालील त्रास होऊ लागल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क करावा.

या गोष्टी आढळल्यास डॉक्टरांना संपर्क करा :

 • श्वास घ्यायला त्रास.
 • पल्स ऑक्सिमीटर – बोटाला लावून शरीरातली ऑक्सिजनची पातळी तपासण्याचं यंत्र जर 95 पेक्षा कमी पातळी दाखवत असल्यास.
 • 24 तास 100.40 फॅरहाईट (38 C) पेक्षा जास्त ताप.
 • 6 मिनिटं चालल्यानंतर थकवा येणं.
 • छातीत सतत दुखणं वा दडपण आल्यासारखं वाटणं.
 • चेहरा किंवा हाता-पायाच्या संवेदना जाणं.
 • गोंधळल्यासारखं वाटणं, बोलताना त्रास होणं.
 • चेहरा किंवा ओठांवर निळे चट्टे.

तब्बेतीची स्वयं देखरेख कशी करावी-

 • शरीरातील ऑक्सिजनची पातळी व ह्रदयाचे ठोके मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमिटरच्या वापर करा.
 • रोज सकाळी, दुपारी आणि रात्री शरीराचे तापमान, ऑक्सीजनची पातळी व पल्स मोजून डाॅक्टरांना कळविणे. 
 • सोबत दिलेली होमिओपॅथीक औषधे आजाराची तीव्रता कमी करून रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत करतात. 

मानसिक आरोग्य कसं जपायचं?

 • होम क्वारंटाईन किंवा आयसोलेशनच्या काळात रुग्ण घरीच असला, तरी त्याला आणि घरातल्या इतरांना मानसिक ताण येऊ शकतो, मनात भीती निर्माण होऊ शकते, दडपण येऊ शकतं, मनात अनेक विचार येऊ शकतात. पण अशावेळी आपलं मानसिक संतुलन नीट ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
 • त्यासाठी एक चांगला दिनक्रम आखावा, यात पुरेसा आहार, पुरेशी झोप, पुरेसा व्यायाम असावा. व्यायाम प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक असतो. योग – ध्यान यासारख्या गोष्टी, छंदांची जोपासना, करमणूक – विरंगुळा यामुळे मनावरचा ताण कमी होतो. 
 • आवडीची गाणी, संगीत, भजन ऐकल्याने मनावरचा ताण कमी होतो.
 • जास्त वेळ फोनवर बोलणे,गप्पा मारणे टाळावे कारणं बोलतांना श्वासाची गती आणि खोली कमी होते.
 • पण यासोबतच काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. नकारात्मक बातम्या, नकारात्मक संदेश किंवा आपल्याला नको ते अनाहूत सल्ले देणारी मंडळी, या सगळ्यागोष्टी टाळायला हव्यात.
 • पॉझिटिव्ह व्यक्तींच्या मनामध्ये भीती असते. अशावेळी या व्यक्तीला बोलतं करणं महत्त्वाचं आहे. त्याच्या मनातली भीती, चिंता, दुःख, अपराधाची बोचणी यांना वाचा फोडणं महत्त्वाचं आहे. त्या व्यक्तीशी संवाद सांधणं, तिचं ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. धीर देणं महत्त्वाचं आहे.
 • “आपण सगळे एकत्र आहोत, आपण सगळे मिळून या परिस्थितीचा सामना करू, अशा प्रकारचा सूर संपूर्ण कुटुंबाने आणि मित्रमंडळींनी आळवणं महत्त्वाचं आहे.”

# कोरोना व तत्सम विषाणूंच्या आजारांशी लढण्यासाठीत आपली प्रतिकारशक्ती चांगली असणं आवश्यक आहे.

 • प्रतिकारशक्तीवाढविण्यासाठी सगळ्यात जास्त वाटा आहाराचा आहे. होमक्वारंटाइनच्या काळात असा आहार घेउन आपली प्रतिकारशक्ती वाढवा.
 • पचनास हलका, प्रोटीनयुक्त आहार घेतल्यास प्रकृती सुधारण्यासाठी मदत होते. 
 • जेवनात  साखर , मिठ व तेलाचा  प्रमाण मर्यादित ठेवा.
 • न्याहारीत उपमा, थालिपीठ, घावण(तांदूळ, ज्वारी,बाजरी, नाचणी), थेपले, पराठे या पदार्थांचा समावेश करावा.
 • आहारात प्रोटीनची मात्रा वाढवायला हवी.रुग्ण जर मांसाहार करत असेल तर  आपल्या आहारात अंडीचा समावेश करावा. शाकाहारी रुग्णांनी पनीर,दूध, सोयाबीन, मोड आलेली कडधान्ये, डाळी इ. पदार्थांचा समावेश करावा. सुक्यामेव्यात बदाम,अक्रोड, अंजीर, खजूर, बिया( सुर्यफूल,टरबूज, भोपळा, जवस, तीळ) घ्यावे.
 • मांसाहारी पदार्थ नीट शिजवून व प्रमाणात खा.
 • ताज्या फळांतुन जे विटामिन व खनिजे मिळतात, ती ज्यूसमधून मिळणार नाही. फळांमध्ये केळी(वेलची),सफरचंद, कलिंगड, टरबूज, डाळींब, पपई,संत्री, मोसंबी, अंजीर यांचा समावेश करावा. कफ वाढवणारी फळं टाळावीत.
 • बाहेरचे अन्न(विशेषतः कच्चे अन्न, फळांचे रस,उघड्यावरचे पदार्थ,उसाचा रस),बाहेरचे पाणी आणि थंड पदार्थ (आइसक्रीम, कोल्ड ड्रिंक्स ) टाळावे. 
 • भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ घ्यावेत. 
 • कोमट पाणी प्यायल्याने पचन क्रिया सुधारते व घशाला आराम मिळतो.
 • गरम पेय(सूप,गरम पाणी, वरण,काढा)घ्यावीत. 
 • काढा करण्यासाठी आले,हळद, पुदीना, लवंग दालचिनी, मिरी, जेष्ठमध,तुळशीची पान या सारख्या पदार्थांच्या वापराने घशाला आराम मिळतो. चवीसाठी गुळ किंवा मध घाला.
 • गाजर,बीट,मुळा,काकडी,टोमॅटो या सॅलडचा आहारात समावेश करा.
 • आलं मधाबरोबर खाल्याने कफाचा त्रास कमी होउन श्वसनक्रिया सुधारते.
 • रात्रीच्या वेळी दूध हळद घेतल्याने कफ कमी होतो, झोप शांत लागते.

व्यायाम:

खाली सुचवलेले व्यायाम प्रकारामुळे 

आजाराची  तीव्रता  आणि थकवा इ.कमी करता येतो. श्वसन संस्थेचे कार्य सुधारते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. दिवसातून 2 वेळा हे व्यायाम प्रकार करावे.

खालील लींकवर सुचवलेले व्यायाम प्रकार दिवसातून 2 वेळा करावे :

प्राणायाम, कपालभाती,ध्यानधारणा यांनी श्वसनक्रिया अधिक मजबूत होते.

अधिक माहितीसाठी डाॅक्टरांशी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

Sai Clinic

Dr. Shailesh S. Bomble

(M.B.B.S  F.I.G.P)

Mob no. 9850896963


Sai Homoeo Clinic

Dr. Anupama S. Bomble

Consulting Homoeopath

Mob no. 9922407781

Address : Sai Krishna Complex, Aakurdi Chikhali road, Sane Chowk, Chinchwad Pune- 411019

Reviews


Shakuntala Kumbhar

In October I was feeling feverish and weak, which I thought was Viral Fever. I visited Dr. Bomble, who suggested me to get tested for COVID-19 for which I tested positive. Doctor told me not to panic and gave me treatment while I was home quarantined. He would follow up on symptoms everyday and continued his treatment. I recovered fast and I am extremely thankful to him for it.

Shubham Bodhe

Excellent clinic with proper facilities and experienced Dr Shailesh Bomble.
I have recovered from covid as there was best treatment given by Dr bomble for home quarantine… All you need to do is follow proper measures and medication under his consultation… Totally satisfied 🙌😇

Anand Prahladrao

We got covid but got apt home treatment and suggestion about home quarantine and medication by Dr. Shailesh Bombale. Sir was regularly monitoring our oxygen levels and giving suggestions time to time.
Previous
Next